झुंज
मी एक मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा, बाबा एका खासगी कंपनीत नौकरीला,घरी आई आणि दोन बहिणी असा माझा कुटुंब. नागपुरातील रामदासपेठ येथील काछिपुरा या झोपडपट्टी एरियात माझे बालपण गेले. पाचवी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत घेतले . सहावीत असताना बाबांचे ट्रान्स्फर मध्यप्रदेश येथील एका मोठ्या कंपनीत झाले आणि आम्ही त्या झोपडपट्टीतून बाहेर पडलो . तेथे गेल्यावर सिबिअसि शाळेत एडमिशन घेतले, तशी घरची परिस्थिती बरीच, पण अभ्यासात मन लागेना, पण बाबांच्या धाकाने कसेबसे तेथे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणास नागपूरला परत आलो. शिक्षण झाले आणि मी सुद्धा बाबां प्रमाणे एका मोठ्या खासगी कंपनीत नौकरीला लागलो . सकाळी १० ला ऑफिसला जाने आणि सायंकाळी ७ ला परत घरी येणे असा माझा रोजचा कार्यक्रम असायचा .
अशाच एका सायंकाळी मी माझ्या बाईक नि घरी निघालो . रस्त्यात रेणुका नगर येथील झोपडपट्टी पडायची , घरी जायची वेळ आणि रस्त्यात दारूड्यांची धुमाकुळ या कारणास्तव कुणी हि तिथे थांबायला अथवा कुणाची मदत करायला तयार नसे . त्या दिवशी जरा उशीरच झाला होता, रेणुका नगरला पोहोचलो त्या वेळेला सव्वा आठ झाले होते. ऑक्टोंबर महिना असल्याने थोडी थंडी होती. विचार होता घरी जाऊन मस्त जेवायचे आणि पटकन झोपायचे, पण रस्त्यात एका १२-१३ वर्षांचा मुलाने मला हाथ देऊन लिफ्ट मागितली , मी गाडी न थांबवता पुढे निघून गेलो पण मग मनात विचार आला कि रात्र झाली आहे आणि हा मुलगा लहान असून जवळच राहत असेल, मी थोड्या अंतरावर जाऊन गाडी थांबविली , तो लगेच धावत येवून गाडीवर बसला. मी गाड़ी चलवायला लागलो,कही अंतरावर जातच तो माझ्याशी बोलला . . .
मुलगा : दादा तुम्ही कूठ पर्यन्त जाणार आहात ...?
मी : मी मनीष नगर ला जाणार आहे, का बऱ तुला कुठे जायचे आहे…??
मुलगा : मला खामल्याला सोडाल काय.. . ?
मी : हो चालेल
मुलगा : दादा तुम्ही कुठे जॉब करता??
मी : मी एका प्रायवेट कंपनी मधे डेटा बेस मैनेजर म्हणून कामास आहे .
मुलगा : दादा तुमच्या ऑफिस मधे जागा आहेत काय. . .??
मी : का रे कुणाला हवय जॉब....?
मुलगा : मला…… (मला लगेच हसु आले )
मी(हसतच) : का रे तुला कशाला पाहिजे जॉब आणि तू तर आता भरपूर लहान आहे जॉब करायला,आम्हाला चाइल्ड लेबर एक्ट मधे पठावशील काय जेलात …(मी थट्टा केली )
मुलगा : सगळे अशीच बोलतात, मला कुणी ही काम देतच नाही …(मग तो काही विचार करीत बोलला)
मुलगा : माझा दादा बीए फर्स्ट ईयर ला आहे, त्याला....
मी : अरे तो शिकतोय न सध्या तर त्याला बोल की अगोदर अभ्यास पूर्ण करायचा आणि त्या नंतर जॉब शोधायचा …
मुलगा : दादा त्याला आता काम करने आवश्यक आहे.…(मी पहिल्यांदाच त्याच्या आवाजात असलेल्या चिंतेचा भाव आणि गंभीरपणा धरला,तो आणखी हळू आवाजात बोलला )
मुलगा : माझे बाबा नाहीत आणि आई आठ दिवस झाले कामाला जात नाहीये …… !!!
मी : का बरर,काय करते तुझी आई ……??
मुलगा : माझी आई सहा घरांची भांडी घासते ,कपडे धुते आणि स्वयंपाक करून देते…तिला ३५०० रुपये मिळतात,त्या मधे ती घरचे खर्च व आमचे शिक्षण करते.डॉक्टर म्हणाले की तिला मलेरिआ झाला आहे आणि तिला बरे व्हायला दहा दिवस लागतील .
मी : आणि बाबा कसे ……???
मुलगा :( माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो बोलला )बाबा मी लहान असतानाच वारले ....
मी : अच्छा , तिला औषधीला पैसे लागतात काय …… ??
मुलगा : नाही , दादानी त्याच्या मित्रा कडून काही पैसे उधार घेतले आहेत आई बरी झाली की करेल ती पैसे परत पण ……(तो बोलता बोलता एकदम थांबला)
मी : काय रे काय झाले …?? अरे सांग ना ……
मुलगा : मी एका प्राइवेट शाळे मधे दहाविला शिकतो , उद्या मला तिथली फिस भरायची आहे ,पण माझ्या कड़े पैसेच पूर्ण होत नाही आहे… जर मी उद्या फिस नाही भरली तर मला परीक्षेत बसता येणार नाही ....
मी : किती पैसे भरायचे आहेत ……??
मुलगा : आठशे रुपये....पण मी सहाशे रुपये जमा केलेले आहेत ....
मी : ते कसे……???
मुलगा : माझा काकूंनि मला २०० रू दिले , मी कही पैसे जमा केले होते ते जवळ पास २०० निघाले, एका इंटरनेट कैफ़े मधे गेलो होतो तिथे मी त्यांचे ४०० पेजेज टाइप करूँ दिले तर त्यांनी माला २०० रु दिले, पण आज मला कुठूनच पैसे मिळत नहियेत.... (तो पुन्हा शांत झाला )
मी : तर पुन्हा तय कैफ़े मधे विचार ना …
मुलगा : मी तिथे गेलो होतो पण ते म्हणाले की आज त्यांचा कड़े काहीच नहीं आहे टाइप करायला .
मी : अरे तुझे स्टॉप आले……
मुलगा : दादा तुम्ही मला थोड़ी मदत कराल… ???
मी : (खिश्यातून २००रु काढून त्या पुढे सरकावले) हे घे ……
मुलगा : नाही दादा मला पैसे नकोत , माझी आई म्हणते की मेहनत केली तर फळ मिडते ,मी जर तुमच्या कडन पैसे घेतले तर मला अस वाटेल की मी भिक मागून आणली पण मला भिक नको दादा ,इथे जवळच एक होटल आहे माला तीथ पर्यन्त सोडून द्या मी तिथे कही काम विचरतो....(मी त्याची ईमानदारी बघून थक्क झालो )
मी : (हातातील घड्याळी कड़े बघत) अरे पण आता रात्रीचे ९ वाजले आहेत तुला घरी पण जायचे असेल न....हे घे माझे विजिटिंग कार्ड आणि कही मदत लागली तर मला फोन कर.....
मुलगा : दादा मी पाई चालला जाईल , तुम्हाला वेळ होत असेल तुम्ही घरी जा,धन्यवाद दादा …
(त्या कड़े बघत मी पुन्हा पैसे पुढे केले,पण तो पुढे निघून गेला,मी स्वतः ला त्याचा जागेवर ठेवून विचार केला आणि नकळत माझ्या डोळ्यात अश्रु आले.मी पुढे बघितले सिग्नल हिरवा झाला होता मी पण माझ्या डोळ्यांपुढे मात्र अंधारच फिरत होता, मी लगेच पुढे निघालो,विचार केला की हा मला कॉल करेल मदतीला पण असे काहीच झाले नहि…डोक्यात सतत विचार यायचे की आकाश ला परीक्षेत बस्ता आले असेल काय??? माझ्या या प्रश्नाच उत्तर फ़क्त आकाशच देऊ शकला असता .... काही दिवसांनी मी सगळ विसरलो पण लक्षात राहिला तितका तो आकाश पाटिल आणि त्याची ती झुंज )

No comments:
Post a Comment